सोनाली फोगाट हत्या प्रकरणी पाचवा संशयित पोलिसांच्या कह्यात !

हॉटेलचा कर्मचारी तथा संशयित दत्तप्रसाद गावकर याला रामदास मांद्रेकर यानेच मेथाफेटामाईन (एम्.एम्.डी.ए.) हे घातक अमली पदार्थ पुरवले होते, असे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. रामदास मांद्रेकर याने गुन्ह्यांची स्वीकृती दिल्याची माहिती हणजुणे पोलिसांनी दिली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे !

मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जनतेला शिस्त लावणे आवश्यक !

गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेसंदर्भात वसई-विरार महापालिका आयुक्तांना शिवसेना युवासेनेच्या वतीने निवेदन !

गणेशमूर्तींचे तलावांमध्ये विसर्जन करण्यास अनुमती देण्याची मागणी

‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणात रवाना

गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत २८ ऑगस्ट या दिवशी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने १ सहस्र ८०० चाकरमानी रवाना झाले. मुंबई भाजपाच्या वतीने खास कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी विनामूल्य ‘मोदी एक्स्प्रेस’ या रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

संकेतस्थळावर तक्रार प्रविष्ट करण्याची सुविधा बंद ठेवून नागरिकांना मात्र तक्रार करण्याचे आवाहन !

गणेशोत्सवाच्या कालावधीत भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून भाविकांची आर्थिक लूट चालू आहे. ‘या विरोधात तक्रार आली, तरच कारवाई करू’, अशी भूमिका घेणार्‍या मोटार वाहन विभागाने संकेतस्थळावर तक्रार करण्यासाठीची सुविधा बंद ठेवली आहे.

फटाके मर्यादित स्वरूपात लावा ! – सुनील देसाई, अध्यक्ष, सदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोंडा

गणेशोत्सव काळात केवळ फोंडा तालुक्यात फटाक्यांवर ५० लक्ष रुपये व्यय (खर्च) केले जातात, तर मग पूर्ण राज्यात किती पैसे खर्च होत असतील ? वर्ष २०१९ मध्ये फोंडा तालुक्यात एकूण ६ ठिकाणी फटाक्यांमुळे भाजण्याच्या  दुर्घटना घडल्या होत्या आणि यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी यांची सदिच्छा भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीन पराग गोखले आणि महेश पाठक यांनी ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी यांची भेट घेऊन त्यांचे नूतन पुस्तक प्रकाशनाविषयी अभिनंदन केले.

आनंदप्राप्तीसाठी नियमित साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये

दैनंदिन जीवन जगतांना आपल्याला विविध समस्या येतात. यातील काही समस्या प्रारब्धामुळेही निर्माण होतात. यासाठी धर्मशास्त्राने कुलदेवीचे नामस्मरण आणि दत्ताची उपासना सांगितली आहे.

काँग्रेसची खरी मानसिकता जाणा !

पाली (राजस्थान) येथील ‘मारवाड जंक्शन कॉलेज’च्या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची विद्यार्थी शाखा ‘एन्.एस्.यू.आय.’ची सदस्या फिजा खान उपाध्यक्ष झाल्यावर विजय साजरा करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या.

ठाणे स्मार्ट सिटी ‘मोबिलिटी सोल्युशन्स’ या प्रकारात प्रथम पुरस्काराने सन्मानित  !

‘स्मार्ट सिटीज् कौन्सिल इंडिया’च्या वतीने, तसेच केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने २६ ऑगस्ट या दिवशी मुंबई येथे ‘राष्ट्रीय स्मार्ट अर्बनेशन’ परिषदे आयोजन करण्यात आले होते.