तळोजा येथे अमली पदार्थाची विक्री करणार्‍या नायजेरियन व्यक्तीला अटक

नवी मुंबई, २७ ऑगस्ट (वार्ता.) – तळोजा येथे अमली पदार्थाची विक्री करणार्‍या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अँथोनी नैईमेका ओकोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो खारघरमध्ये रहातो.

त्याच्याकडून ५७ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले असून ८ लाख ६२ सहस्र रुपये इतकी त्याची किंमत आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या धंद्यांत नायजेरियन सापडत असतांना देशातील प्रत्येक नायजेरियन व्यक्तीकडे संशयाने पाहून त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे, तसेच नायजेरियन व्यक्तींना भारतात येण्याची अनुमती दिली जाण्यापूर्वी त्यांची अतीकसून चौकशी होणे आवश्यक आहे ! – संपादक)

तळोजा ‘फेज १’ या परिसरात एक जण अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला कह्यात घेऊन झडती घेतली. त्या वेळी त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले.

संपादकीय भूमिका

अमली पदार्थांच्या धंद्यात सातत्याने पकडल्या जाणार्‍या नायजेरियन व्यक्तींना कायमस्वरूपी त्यांच्या देशात का पाठवून दिले जात नाही ?