नियमांचे उल्लंघन करणार्‍या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करू ! – माधव जगताप, पुणे महापालिका

पुणे – गणेशोत्सवातील मंडपाच्या आकाराच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असून, त्या आदेशानुसारच मंडप उभारणी करावी लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नियमानुसारच मंडपाचा आकार ठेवावा. जी गणेशोत्सव मंडळे त्याचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी चेतावणी पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे. शहरामध्ये श्री गणेशमूर्ती विक्रीची ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. त्यानुसार मूर्तीकार, उत्पादक आदींना एकत्रितपणे मूर्ती विक्रीची दुकाने थाटावी लागणार आहेत. संबंधित विक्रेत्यांनी महापालिकेकडून रितसर अनुमती घ्यावी. ‘दुकाने अथवा टपरी उभारणे या स्वरूपाचे अतिक्रमण केल्यास त्यांच्यावरही कारवाई करू’, असे जगताप यांनी सांगितले.