तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील मशिदीवरील भोंगे बंद करण्यात यावेत !

मशिदीवरील भोंग्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत आहे. त्यामुळे भोंगे बंद करण्याविषयी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, तसेच तुळजापूर खुर्द येथील सभागृहावरील ‘मशीद’ हे नाव हटवण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले.

धाराशिव येथील खासगी आस्थापनाची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त !

येथील ‘एम्.आय.डी.सी.’ मधील भाग्यनगर-मुंबई मार्गावर असलेली हे आस्थापन सध्या बंद आहे. कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे आणि देवेंद्र उमेश शिंदे हे वडील अन् मुलगा आस्थापनाचे संचालक आहेत.

निधन वार्ता

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सुरेश काशेट्टीवार यांच्या मातोश्री श्रीमती सुमती नामदेव काशेट्टीवार (वय ९३ वर्षे) (रा. पौभुर्णा, जिल्हा चंद्रपूर) यांचे ६ जुलैच्या रात्री ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

अमरावती येथे दूषित पाण्याचे ३ बळी; ८० जणांची प्रकृती खालावली !

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मेळघाटच्या पाचडोंगरी येथे दूषित पाणी प्यायल्याने कॉलरासदृश आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर ८० जणांची प्रकृती खालावली आहे.

खारघर येथे गाडीचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेले !

खारघरमध्ये ९ जुलै या दिवशी सकाळी वाहतूक पोलिसाला चारचाकी चालकाने भरपावसात गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले. या प्रकरणी चालकाविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उमेश कोल्हे यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी राणा दांपत्याचे हनुमान चालिसाचे पठण !

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याच्या कारणावरून शहरातील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची ३ धर्मांधांनी २१ जून या दिवशी हत्या केली होती.

अशा घटना कधी थांबणार ?

अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील नूरपूरमध्ये हिंदु कुटुंबातील दोघा तरुणींची वरात शाही मशिदीजवळून जात असतांना वरातीत सहभागी झालेल्यांवर मुसलमानांच्या घरांवरून अंडी फेकण्यात आली.

विठ्ठलनामाचा महिमा !

‘जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल’, असे म्हणणारे वारकरी व्याधींपासून मुक्त होतात. त्याचे शास्त्रीय कारण, म्हणजे त्यांच्याकडून होणारे ‘विठ्ठल’ या नामाचे उच्चारण !

मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांचे संघटन करा !

मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्या माध्यमातूनच समाजाचे आध्यात्मिक बळ वाढून त्यातून राष्ट्रातील धर्म टिकण्यास साहाय्य होईल !