विठ्ठलनामाचा महिमा !

विठ्ठलाच्या नामजपामुळे वारकरी व्याधींपासून मुक्त होत असल्याचे आधुनिक वैद्यांनी सिद्ध करणे

पंढरपूरची वारी ही अतिशय विस्मयकारक आणि सर्वसामान्य मानवजातीला वरदानच ठरलेली आहे. सर्व वारकऱ्यांना काही ना काहीतरी व्याधी असतात. कुणाला श्वसनाच्या तक्रारी, तर कुणाला हृदयाच्या ! असे असूनही ‘ते अडीचशे मैल अनवाणी प्रवास करून त्यांची प्रकृती उत्तम कशी रहाते ?’, याचे उत्तर आधुनिक वैद्यांनी प्रयोगाअंती शोधून काढले.

‘जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल’, असे म्हणणारे वारकरी व्याधींपासून मुक्त होतात. त्याचे शास्त्रीय कारण, म्हणजे त्यांच्याकडून होणारे ‘विठ्ठल’ या नामाचे उच्चारण. एका व्यक्तीवर प्रयोग करून ‘रक्तदाब आणि हृदयरोगाचे वाढते प्रमाण रोखण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे ‘नामस्मरण’, हे आधुनिक वैद्यांनी सिद्ध केले.

प्रत्येक व्यक्तीने दिवसाकाठी ९ मिनिटे शांत चित्ताने ‘विठ्ठल’ हे नामस्मरण करावे. ते करतांना ‘ठ्ठ’ या शब्दावर जोर द्यावा. त्याने आजार पूर्णपणे नाहीसे होतात.

(साभार : साप्ताहिक अणुरेणू (१५.७.२०१७))