उमेश कोल्हे यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी राणा दांपत्याचे हनुमान चालिसाचे पठण !

अमरावती – नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याच्या कारणावरून शहरातील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची ३ धर्मांधांनी २१ जून या दिवशी हत्या केली होती. उमेश कोल्हे यांच्या आत्म्याला शांती मिळावी, या हेतूने येथील खासदार सौ. नवनीत राणा आणि आमदार श्री. रवी राणा यांनी कोल्हे कुटुंबियांसह त्यांच्या लोकमान्य कॉलनी परिसरातील घरालगतच्या हनुमान मंदिरात ९ जुलै या दिवशी ‘हनुमान चालिसा’चे पठण केले. या वेळी कोल्हे कुटुंबियातील अनेक सदस्य, तसेच युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.