खारघर येथे गाडीचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेले !

नवी मुंबई – खारघरमध्ये ९ जुलै या दिवशी सकाळी वाहतूक पोलिसाला चारचाकी चालकाने भरपावसात गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले. या प्रकरणी चालकाविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विरुद्ध दिशेने येत असल्याने चालकाला वाहतूक पोलीस कर्मचार्‍याने अडवले; पण चालकाने त्यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना फरफटत नेले.

संपादकीय भूमिका

पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे उदाहरण !