रामनाथी (गोवा) – येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सुरेश काशेट्टीवार यांच्या मातोश्री श्रीमती सुमती नामदेव काशेट्टीवार (वय ९३ वर्षे) (रा. पौभुर्णा, जिल्हा चंद्रपूर) यांचे ६ जुलैच्या रात्री ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, २ सुना, ३ मुली, जावई, नातवंडे अणि पतवंडे असा परिवार आहे. मोठी सून सौ. सुचिता सुरेश काशेट्टीवार, नात सौ. सारिका कृष्णा आय्या, नातजावई श्री. कृष्णा आय्या आणि पणतू कु. विश्व कृष्णा आय्या हेही गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करतात. सनातन परिवार काशेट्टीवार आणि आय्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
वशेणी (उरण) – येथील सनातनचे साधक आणि सेवानिवृत्त शिक्षक चंद्रहास गावंड (वय ७४ वर्षे) यांचे ४ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने त्यांचे कार्य पाहून त्यांना ‘ब्रह्मर्षी’ उपाधी देऊन सन्मानित केले होते. ते ३१ वर्षे शिक्षक होते. त्यांनी विविध ठिकाणी कीर्तन, प्रवचने घेऊन समाजात प्रबोधन केले. त्यांच्या पश्चात २ मुलगे, २ सुना, १ मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार गावंड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.