धाराशिव – जिल्ह्यातील उमरगा येथील ‘जोगेश्वरी ब्रिव्हरेज’ या खासगी आस्थापनावर ‘मनी लॉड्रिंग कायदा २००२’ अंतर्गत कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने ४५.५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हे आस्थापन कोल्हापूर येथील असून मद्यनिर्मिती क्षेत्रात काम करत आहे. येथील ‘एम्.आय.डी.सी.’ मधील भाग्यनगर-मुंबई मार्गावर असलेली हे आस्थापन सध्या बंद आहे. कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे आणि देवेंद्र उमेश शिंदे हे वडील अन् मुलगा आस्थापनाचे संचालक आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावरून या कारवाईची माहिती दिली आहे.