डॉ. आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी सरकार काय करत आहे ? – उच्च न्यायालय

मुंबई – राज्य सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना करत आहे ?, त्याविषयी २ आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या हस्तलिखित साहित्याचे संवर्धन करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर सुनावणी करतांना हे हस्तलिखित साहित्य संवर्धित करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये नव्या सदस्यांची नियुक्त का करण्यात आली नाही ? असा प्रश्न न्यायालयाने विचारला केला. या हस्तलिखित साहित्याच्या प्रकाशनाचे काम आणि त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आतापर्यंत काय केले, हेही प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.