गौहत्ती (आसाम) – आसाममधील पूरस्थिती अधिक बिकट होत असून आतापर्यंत पुराच्या पाण्यामुळे राज्यातील ५४ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून मे मासाच्या मध्यापासून पडत असलेल्या पावसामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १०१ वर गेली आहे. राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांमधील मोठमोठ्या प्रदेशांचा संपर्क तुटला असून ब्रह्मपुत्र आणि बरक या नद्या, तसेच त्यांच्या उपनद्या दुथडी भरून वहात आहेत. राष्ट्रीय आपत्कालीन निवारण दल आणि राज्य आपत्कालीन निवारण दल युद्धस्तरावर लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.