तुळजापूर खुर्द (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात !

कळसारोहणाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या धार्मिक विधींमध्ये सहभागी झालेले भाविक

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १ मे (वार्ता.) – तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने २६, २७ आणि २८ एप्रिल या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जगद्गुरु सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती शंकराचार्य स्वामी, संकेश्वर (कर्नाटक) यांच्या हस्ते कळसारोहण करण्यात आले. या वेळी माजी आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे, तहसीलदार सौदागर तांदळे, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद, सुनील रोचकरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कळसारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने कळसासह जलयात्रा काढण्यात आली होती. यामध्ये अनेक महिला भाविक सहभागी झाल्या होत्या.

वेदमूर्ती नागेशशास्त्री नंदीबुवा अंबुलगे यांचा ‘धर्मभूषण’ पदवीने गौरव !

वेदमूर्ती नागेशशास्त्री नंदीबुवा अंबुलगे यांचा गौरव करतांना १. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी

कळसारोहणाच्या मंगलप्रसंगी श्री गुरुचरित्र अध्याय ४५ मध्ये उल्लेख असलेले नंदीमामा यांचे तुळजापूर येथील १४ वे वंशज वेदमूर्ती नागेशशास्त्री नंदीबुवा अंबुलगे यांना त्यांनी केलेले धर्मकार्य पाहून जगद्गुरु सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती शंकराचार्य स्वामी यांच्या हस्ते ‘धर्मभूषण’ या पदवीने गौरवण्यात आले, तसेच या वेळी नंदिबुवा-अंबुलगे परिवाराकडून स्थानिक ब्रह्मवृंदाचा सत्कार करण्यात आला.