महाराष्ट्रात ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चित्रपटगृहे अनुपलब्ध ! – दिग्दर्शकाची खंत

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटानंतर मागील सप्ताहात ‘शेर शिवराज’ हा चित्रपट जवळजवळ ३०० चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद लाभला; परंतु आता दुसर्‍या सप्ताहात या चित्रपटाला चित्रपटगृहेच मिळत नाहीत, अशी खंत निर्माते आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी खंत व्यक्त केली आहे.

‘शिवरायांनी अफझलखानाचा वध केला, त्या प्रतापगडाची शौर्यगाथा चित्रपटात मांडली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतांनाही पुरेशा प्रमाणात चित्रपटगृहे मिळू नयेत, मिळाली तरी सकाळी आठ किंवा रात्री दहा अशा वेळा देण्यात येतात. अशा वेळी कुटुंबाला घेऊन चित्रपट कसा पहाणार ? ही दुर्दैवाची गोष्ट आहे’, असे दिग्दर्शक म्हणाले.

संपादकीय भूमिका

आशयघन आणि ऐतिहासिक विषय असणार्‍या मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात, विशेषतः छत्रपती शिवरायांच्या राज्यातच चित्रपटगृहे मिळत नाहीत. त्यासाठी सतत संघर्ष करावा लागणे दुर्दैवीच !