खोपोली येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्माभिमानी हिंदू एकवटले !

खोपोली (जिल्हा रायगड), ३० एप्रिल (वार्ता.) – गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या; मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’ हे समस्त हिंदू बांधव, हिंदु संघटना आणि हिंदू नेते यांच्यापुढील मोठे आव्हान आहे. वर्ष २०६१ मध्ये भारतात हिंदू अल्पसंख्याक होणार आहेत. पृथ्वीच्या पटलावर ‘हिंदु’ अगोदरच अल्पसंख्यांक आहेत. आपल्या एका पिढीने बलीदान दिल्याने आपण स्वतंत्र भारतात जगू शकत आहोत. आता भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग केला नाही, तर हिंदूंचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. भारतभूमी या हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन यांचे बलीदान मागत आहे. हिंदु बांधवांसह हिंदू संघटनांनी सर्व बिरूदावल्या बाजूला ठेवून एकत्र यायला हवे आणि वैध मार्गाने लढा द्यायला हवा, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने खोपोली येथील मुंबई-पुणे जुना हायवेजवळील समर्थ कृपा ग्रीन हाऊस सभागृह येथे २८ एप्रिल या दिवशी पार पाडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माचरणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनीही उपस्थित हिंदूंना ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठीचे योगदान’ संबोधित केले. संत आणि मान्यवर यांच्यासह १८० धर्माभिमानी हिंदू सभेला उपस्थित होते. या सभेतून प्रेरणा घेऊन रायगड जिल्ह्यातील खोपोलीच्या नजीकच्या गावागावांमध्ये अशा हिंदु राष्ट्र जागृती सभा घेण्याची सिद्धता उपस्थित धर्मप्रेमींनी दर्शविली.
रायगडभूषण ह.भ.प. रामदास भाई पाटील महाराज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यांनी व्यासपिठावरील विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर वेदमंत्रपठण करण्यात आले. समितीच्या देशभरातील व्यापक कार्याविषयी समितीचे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी सांगितले. हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेऊन सभेची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन समितीचे श्री. मिलिंद पोशे आणि श्री. सुनील कदम यांनी केले.
सभेला उपस्थित संत आणि मान्यवर
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू (सुश्री) अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव, रायगडभूषण ह.भ.प. रामदास भाई पाटील महाराज, रायगड भूषण ह.भ.प. काशिनाथ पारठे, खोपोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. अमोल जाधव, खोपोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. दिलीप जाधव, शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री. विलास बारस्कर, स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रमोद शिर्के, उंबरे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. समीर पांगारे, शिवसेनेचे खोपोली उपशहरप्रमुख श्री. संदीप पाटील
गुरुकृपेच्या बळावर ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाची निर्मिती आणि कार्य !
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !