नाशिक येथील मनसेच्या शहराध्यक्षांना अटक !

दिलीप दातीर

नाशिक – भोंग्यांविषयी आंदोलनाची चेतावणी देणारे मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना येथील सातपूर पोलिसांनी ७ मे या दिवशी अटक केली आहे. दातीर हे २ दिवसांपासून पसार होते. नाशिक येथे भोंग्यांच्या विरोधी आंदोलनात ठिकठिकाणी मशिदींसमोर ध्वनीक्षेपकांवर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना अटक केली होती. या वेळी शहराध्यक्ष दिलीप दातीर ते पसार झाले होते. पोलिसांनी त्यांना नंतर अटक केली; मात्र मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार अद्याप पसार आहेत.