रायगड – येथील माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार झाले असून ३० प्रवासी घायाळ झाले आहेत.
म्हसळा तालुक्यातील धनगर मलई येथील नालासोपाऱ्यात राहणारे नागरिक त्यांच्या गावाला एका कार्यक्रमासाठी बसने जात होते. ही बस बोर्ली-श्रीवर्धनकडे जात असतांना सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घोणसे घाटात अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी घायाळ प्रवाशांना म्हसळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे.