अकोला जिल्ह्यात १ सहस्र ३१८ भोंगे अनधिकृत !

अकोला – जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर १ सहस्र ३१८ भोंगे लावण्यात आले आहेत; मात्र सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे अनधिकृत आहेत. केवळ अकोट येथील देवी मंदिरावरील भोंग्याची एकच अनुमती यापूर्वी घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात लहान आणि मोठ्या मंदिरावर ४४६, मशीद आणि दर्गे यांवर ६३३, बुद्ध विहारावर १४०, चर्च आणि गुरुद्वार यांवर प्रत्येकी १ अन् इतर धार्मिक स्थळांवर ३, असे एकूण १ सहस्र ३१८ भोंगे लावलेले आहेत. हे सर्वच भोंगे अनधिकृत आहेत. भोंगे लावण्याविषयी रितसर अनुमतीचे अर्ज धार्मिक स्थळांकडून घेण्यात आले होते. त्यानुसार शहरातील कच्छी मशिदीला भोंगे लावण्याची अनुमती देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दिलेली ही पहिलीच अनुमती ठरली आहे.

संपादकीय भूमिका

पोलीस यावर कारवाई कधी करणार ?