कल्याण येथे गोवंशियांचे मांस असणाऱ्या टेंपोवर कारवाई !

एका धर्मांधांस अटक

(प्रातिनिधीक छायाचित्र)

ठाणे, ८ मे (वार्ता.) – कल्याण (पूर्व) येथे गोमांसाने भरलेल्या टेंपोवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मदार उस्मान कुरेशी या धर्मांध टेंपो चालकास अटक केली आहे.

कल्याण (पूर्व) येथील मलंग रोड भागातील १०० फुटी रस्त्याजवळ साईलीला गॅलेक्सी या इमारतीच्या शेजारी २ मेच्या रात्री ९ वाजता गोवंशीय जनावरांच्या मांसाने भरलेला टेंपो काही हिंदुत्वनिष्ठांना आढळला. त्यांनी याविषयी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यावर टेंपोमध्ये २५० किलो ग्रॅम वजनाचे गोवंशियांचे मांस आढळून आले. पोलिसांनी हा टेंपो आणि ६० सहस्र रुपये किमतीचे गोवंशियांचे मांस हस्तगत केले आहे. ‘या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधार शोधावा, तसेच अटक करण्यात आलेल्या धर्मांध चालकास कठोर शिक्षा करावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ करत आहेत.

संपादकीय भूमिका

कठोर शिक्षेअभावीच धर्मांध गोवंशियांची हत्या करण्याचे धाडस करत आहेत.