परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान

देहली – हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान आणि सनातन संस्थचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत देहलीमधील श्री संतोषीमाता मंदिर, अलकनंदा मार्केट, कालकाजी आणि सी-९ मंदिर, वसंत कुंज येथे सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. नोएडामधील ला रेजिडेंसिया सोसायटीचे मंदिर, समृद्धी सोसायटीचे मंदिर, ग्रेटर नोएडा पश्चिम, शिवमंदिर, सेक्टर २२ येथे प्रार्थनांचे आयोजन केले. ग्रेटर नोएडाच्या वाचिका सौ. अर्चना बर्नवाल यांनी प्रार्थनेच्या सेवेत सहभाग घेतला. मंदिर समितीच्या सर्व महिलांचे चांगले सहकार्य मिळाले. देहली आणि नोएडा येथील सामूहिक प्रार्थनेच्या वेळी धर्मप्रेमींसह उपस्थित भाविकांनी सहभाग घेतला. या वेळी अनेक जिज्ञासूंनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
| देहलीच्या श्री संतोषीमाता मंदिरामध्ये प्रार्थनेच्या वेळी तेथील आचार्य राजकुमार मिश्रा यांनी अर्थासह प्रार्थना सांगितली. ते म्हणाले, ‘‘सर्वजण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी स्वत:साठी विचार करतात, स्वत:साठी मागतात. परात्पर गुरुदेव सर्व सज्जन, राष्ट्र आणि सर्व विश्व यांचा विचार करत आहेत. आम्ही सर्व त्यांचे आरोग्य उत्तम रहाण्याची इच्छा करतो. आम्ही त्यांचे ऋणी आहोत.’’ |
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना