जर युक्रेनने रशियाची युद्धनौका बुडवली असेल, तर ‘तिसर्‍या महायुद्धाला प्रारंभ’ झाला !

दुसरीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, मोस्क्वा युद्धनौका युक्रेनच्या आक्रमणात उद्ध्वस्त झालेली नाही, तर तांत्रिक बिघाडामुळे या युद्धनौकेवर आगीचा भडका उडाला आणि या युद्धनौकेला जलसमाधी मिळाली.’

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजिलेल्या काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दर्शवणाऱ्या ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची भीषण वास्तविकता दाखवणारे प्रदर्शन येथील ‘द बनारस बार असोसिएशन’च्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनेक अधिवक्त्यांनी घेतला.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचे पहिले हनुमान चालिसा पठण !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त १६ एप्रिल या दिवशी कुमठेकर रस्त्यावर खालकर तालीम चौकातील हनुमान मंदिरात सायंकाळी ६ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरती आणि सामूहिक हनुमान चालिसा पठण आयोजित करण्यात आले

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजितसिंह घाटगे यांची तक्रार प्रविष्ट करून घेण्यास कागल पोलिसांचा नकार !

हसन मुश्रीफ यांनी विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप ! हिंदूंवर गुन्हा नोंद करण्यास तत्परता दाखवणारे पोलीस हिंदूंच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

‘हिंदुत्व’ हा शब्द तुम्ही पूजापद्धतीशी जोडू नका ! – चंद्रकांत पाटील, भाजप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘पुढील १५ वर्षांमध्ये ‘अखंड भारत’ होईल. हिंदु राष्ट्र हाच सनातन धर्म आहे’, या केलेल्या विधानावर पाटील यांनी ‘मोहन भागवत यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नका’, असे सांगत वरील प्रतिक्रिया दिली.

विनाशिरस्त्राण असणाऱ्यांना पेट्रोल देणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करावा !

नाशिक येथील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्राद्वारे मागणी !

बळजोरीने वर्गणी मागितल्‍याच्या प्रकरणी सोलापूर येथील तिघांवर गुन्‍हा नोंद !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्‍या निमित्ताने बळजोरी करून २१ सहस्र रुपयांची वर्गणी मागितल्‍याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांचे २ सहस्र महिलांसमवेत हनुमान चालिसाचे पठण !

येथील खासदार सौ. नवनीत राणा यांनी २ सहस्र महिलांच्या समवेत १२ एप्रिल या दिवशी रवी नगर परिसरात हनुमान चालिसाचे पठण केले. तेथील संकटमोचन हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या !

संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना संपणार नाहीत, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !

ट्विटर मुक्त होणार?

‘मस्क यांच्या रूपाने ट्विटरसारख्या मोठ्या सामाजिक माध्यमावर नियंत्रण ठेवू शकणाराही कुणीतरी आहे’, याची जाणीव ट्विटरला झाली असेल. भारतियांनी यातून बोध घेऊन भारतीय सामाजिक माध्यमांना लोकप्रिय करावे, ही अपेक्षा !