विद्यार्थ्यांनो, ‘स्वरांधळेपणा’ म्हणजे काय ?’, हे जाणा आणि त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करा !
‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे पू. किरण फाटक यांचे मौलिक मार्गदर्शन !
‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे पू. किरण फाटक यांचे मौलिक मार्गदर्शन !
‘पूर्वीच्या संतांचा अधिकार केवढा मोठा होता. त्यांच्यासमोर साक्षात् देव यायचा आणि ते देवाला बघू शकायचे. आपला हिंदु धर्म किती महान आहे. अन्य धर्मांत असे काही आहे का ?’
आपल्याला अन्य देवांसारखा मारुति त्याच्या पत्नीच्या समवेत कधीच दिसत नाही. तो एकटाच असतो. आपल्याला त्याला त्याच्या पत्नीच्या समवेत पहायचे असेल, तर आंध्रप्रदेशातील खम्माम या जिल्ह्यात मारुतीचे एक प्राचीन मंदिर आहे. ते एकमेव मंदिर आहे, जिथे मारुति आपल्या पत्नीच्या समवेत आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये प्राणी आणि पक्षी यांना विशेष महत्त्व आहे. काही प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये संबंधित देवतेचे तत्त्व आकृष्ट होते. त्यांच्यामध्ये सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असते. या क्षमतेमुळे त्यांची ओढ अधिक सात्त्विक अशा वनस्पती, साधक, संत आणि वातावरण यांच्याकडे असते.
पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिरातील मारुतिरायांच्या मूर्तीवर पडणारे किरण उगवत्या सूर्यनारायणाचे आहेत. ते प्रथम हनुमंताच्या मुखमंडलावर पडतात आणि नंतर हळूहळू चरणांकडे जातात.
मी मारुतिरायासमोर हात जोडून आणि डोळे मिटून उभा होतो. मी डोळे उघडून मूर्तीकडे पाहिल्यावर ‘मारुतिरायाच्या पापण्यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले. ‘तो आमच्याकडे पहात असून त्याच्या मुखावरील हावभाव पालटत आहेत’, असे मला जाणवले.