पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारच्या विरोधात आज पुन्हा अविश्वादर्शक ठराव !

पाकिस्तान संसद

नवी देहली – पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल या दिवशी संसद पुन्हा स्थापित करून पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव सादर करण्यात यावा, असा आदेश दिला होता. त्यानुसार उद्या, ९ एप्रिल या दिवशी हा ठराव संसदेत सादर केला जाणार आहे. यावर चर्चा होऊन मतदान होणार आहे. इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात गेले असल्याने ते कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे.

अल्पमतात आलेल्या इम्रान खान सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव उपसभापती कासीम सुरी यांनी ३ एप्रिल २०२२ या दिवशी रहित केला होता. त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याची विनंती केल्यावर ती विसर्जित करण्यात आली होती. याविरोधात विरोधी पक्ष सर्वाेच्च न्यायालयात गेले होते.