परीक्षा ‘ऑफलाईन’ घेण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन !

‘हिंदुस्थानी भाऊ’ उपाख्य विकास पाठक यांनी दिलेल्या चिथावणीमुळे १० वी आणि १२ वी चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर !

सोलापूर रेल्वे स्थानकावरून विद्युत् इंजिनद्वारे रेल्वे धावण्यास प्रारंभ !

सोलापूर रेल्वे स्थानकावरून म्हैसूर-सोलापूर-म्हैसूर बसवा एक्सप्रेस, हसन-सोलापूर-हसन, सोलापूर-यशवंतपूर, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्या विद्युत् इंजिनद्वारे धावण्यास २८ आणि २९ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे.

कोल्हापूर येथे क्रांतीकारकांची गाथा उलगडणारा दीर्घांक ‘द प्लॅन’ ४ फेब्रुवारी या दिवशी होणार ! – लक्ष्मीदास जोशी, सचिव, संस्कार भारती

‘संस्कार भारती कोल्हापूर महानगर’ आणि ‘म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूर’ यांचा हा संयुक्त उपक्रम असून हा दीर्घांक केवळ ८ कलाकार सादर करणार आहेत.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना साहाय्य देण्यासाठी ‘ऑनलाईन’ अर्जाची सक्ती नको !

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५० सहस्र रुपये इतके अर्थसाहाय्य केंद्रशासनाने घोषित केले आहे. या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा पोस्टाद्वारे अर्ज केले आहेत

पुणे येथे इन्स्टाग्रामवर अश्लील आणि धमकी देणारे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी २ तरुणींना अटक !

अटक करण्यात आलेल्या तरुणी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लेडी डॉन’ म्हणून वावरत होत्या. सदर तरुणींनी इंस्टाग्रामवर अनेकदा अश्लील शब्दांचा वापर करत व्हिडिओ ‘शेअर’ केले आहेत.

मिरज शहरात (जिल्हा सांगली) पोलिसांनी २ कोटी ४५ लाख रुपयांचे रक्तचंदन धर्मांधाकडून पकडले !

प्रत्येक गुन्हेगारीमध्ये धर्मांधांचा सहभाग देशासाठी धोकादायक आहे !

इन्स्टाग्रामवरील बनावट खात्याद्वारे मुलींशी मैत्री करून त्यांची अश्लील छायाचित्रे काढणारा धर्मांध अटकेत !

इन्स्टाग्रामवर हिंदु मुलीच्या नावे खाते सिद्ध करून त्याद्वारे मुलींशी मैत्री करून त्यांची अश्लील छायाचित्रे काढणार्‍या अबू सलीम अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.

शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर कह्यात !

पात्र विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय कोण आणि कसा भरून काढणार ? आय.ए.एस्. दर्जाचे अधिकारीही अशा प्रकरणामध्ये सामील असल्याने भ्रष्टाचाराची भयावहता लक्षात येते. अशा अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे !

पुन्हा नथुराम !

‘पंडित नथुराम गोडसे यांनी ‘गांधी यांना ३ गोळ्या मारल्या होत्या’, असे जबानीत सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात गांधी यांच्या शरिरातून ४ गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. तर मग चौथी गोळी त्यांना कुणी मारली ?  हे त्या वेळी का शोधण्यात आले नाही ?

‘डेअरी’, दूध संकलन केंद्र बंद करून ‘वायनरी काढा’ ! – सदाभाऊ खोत

शेतकर्‍यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईनचा निर्णय घेतला आहे. गावातल्या ‘डेअरी’, दूध संकलन केंद्र बंद करा आणि वायनरी काढा, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.