|

वसई – इन्स्टाग्रामवर हिंदु मुलीच्या नावे खाते सिद्ध करून त्याद्वारे मुलींशी मैत्री करून त्यांची अश्लील छायाचित्रे काढणार्या अबू सलीम अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी अन्वेषण करून त्याला अटक केली. या अन्वेषणात पुढील धक्कादायक गोष्ट उघड झाली.
अन्सारी याने इन्स्टाग्रामवर सारा वर्मा असे हिंदु मुलीच्या नावे बनावट खाते सिद्ध केले होते. त्यात त्याने स्वतःच्या ओळखीमध्ये (प्रोफाईलमध्ये) तो ‘फॅशन मॉडेल’ असल्याचे म्हटले होते. या माध्यमातून तो मुलींशी मैत्री करत होता. नंतर काही दिवसांनी तो मुलींना एका प्रसिद्ध आस्थापनाच्या विज्ञापनामध्ये काम देण्याचे प्रलोभन दाखवत होता. त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवर ‘व्हिडिओ कॉल’ करून त्यांची अश्लील छायाचित्रे काढत होता. ही छायाचित्रे तो इन्स्टाग्रामवर टाकण्याची (अपलोड करण्याची) धमकी देत मुलींकडून पैशांची, तसेच शरीरसुखाची मागणी करत असल्याचे उघड झाले आहे.
आरोपीने अशा प्रकारे ८ मुलींना फसवले आहे; मात्र फसवलेल्या मुली समोर येत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी फसवणूक झालेल्या मुलींना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !