प्रत्येक गुन्हेगारीमध्ये धर्मांधांचा सहभाग देशासाठी धोकादायक आहे ! – संपादक
मिरज, ३१ जानेवारी (वार्ता.) – आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात मिरजेत चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मिरज पोलीस अन् वन विभाग यांना मिळाली. यानंतर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ९८३ किलो म्हणजेच २ कोटी ४५ लाख ८५ सहस्र रुपयांचे रक्तचंदन पकडले. या प्रकरणी यासिन इनायतउत्ता याला टेंपोसह कह्यात घेण्यात आले आहे. हे रक्तचंदन नेमके कुठून कुठे जात होते ? याचे अधिक अन्वेषण पोलीस करत आहेत.