‘डेअरी’, दूध संकलन केंद्र बंद करून ‘वायनरी काढा’ ! – सदाभाऊ खोत

शेतकरी नेते सदाभाऊ खोत

सांगली, ३१ जानेवारी (वार्ता.) – शेतकर्‍यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईनचा निर्णय घेतला आहे. गावातल्या ‘डेअरी’, दूध संकलन केंद्र बंद करा आणि वायनरी काढा, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, ‘‘राज्य सरकारने साखर कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी, तरच हे सरकार शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत आहे, असे म्हणता येईल. केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. राज्य सरकारकडे निधीच नसल्यामुळे ते केंद्र सरकारकडून येणार्‍या निधीतूनच सध्या राज्यातील योजना चालवत आहेत.’’