भारत सरकारकडून ५४ चिनी ‘अ‍ॅप्स’वर बंदी !

हे ‘अ‍ॅप्स’ वर्ष २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या चिनी अ‍ॅप्सचे नामांतर केलेले किंवा दुसर्‍या ‘ब्रँड’च्या नावाखाली नव्याने प्रकाशित केलेले आहेत.

‘म्हैसुरू-बेंगळुरू टिपू एक्स्प्रेस’चे नाव पालटून ‘वोडेयार एक्स्प्रेस’ करा ! – म्हैसूरतील भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांची मागणी

आक्रमकांच्या स्मृती पुसण्याऐवजी त्या वर्षानुवर्षे जपणारा जगातील एकमेव देश भारत !

एकदाच वापरायच्या प्लास्टिकवर १ जुलै २०२२ पासून बंदी !

यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन, साठवणूक, वितरण आणि वापर यांच्याशी संबंधित सर्व संस्थांना नोटीस पाठवली आहे.

ओडिशातील एका गावात सरपंच पदासाठी निवडणूक लढवत असलेल्या उमदेवारांची गावकर्‍यांनी घेतली लेखी आणि तोंडी परीक्षा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर मतदारांमध्ये अशा प्रकारची जागृती आली, हे कौतुकास्पद असले, तरी ती केवळ एकाच गावात आली आहे, हे भारतियांना लज्जास्पदच होय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’   

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील ‘श्री समर्थ कोचिंग सेंटर’मध्ये वसंतपंचमीच्या दिवशी करण्यात आले विद्यार्थ्यांचे प्रबोधन !

ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे वसंतपंचमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री समर्थ कोचिंग सेंटर’मध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा रोखण्यासाठी युवा पिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच ! या पाश्चात्त्य ‘डे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळत असून काही धर्मांध संघटना जाणीवपूर्वक तो पसरवत आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम !

व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते.