उडुपी येथील भाजपचे आमदार रघुपती भट यांना ठार मारण्याच्या धमक्या

हिजाबच्या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर येथील भाजपचे आमदार रघुपती भट यांना ठार मारण्याच्या धमक्या दूरभाषद्वारे येत आहेत.

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालून शाळेत येण्यापासून रोखल्याने धर्मांधांकडून शाळेची तोडफोड

हिजाब घालायला अनुमती नाही; म्हणून शाळेवर दगडफेक करणारे धर्मांध भारतात रहाण्याच्या लायकीचे आहेत का ? याविषयी ढोंगी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?

(म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान होईल !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी

कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल  हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

समता आणि राष्ट्रीय ऐक्य यांसाठी गणवेशाची कार्यवाही (अंमलबजावणी) करा ! – सर्वोच्च न्यायालयात याचिका

समता आणि राष्ट्रीय ऐक्य यांना चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी अन् विद्यार्थी यांच्यासाठी समान गणवेशाची कार्यवाही करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, लांजा आणि रत्नागिरी येथे महाविद्यालये आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन सादर रत्नागिरी, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करावी. ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालये यांच्या परिसरातील … Read more

मथुरेतील श्री बांके बिहारी मंदिरामधील गर्दीमध्ये गुदमरून वृद्ध भाविकाचा मृत्यू

मंदिरात गर्दी होणार नाही, याची दक्षता मंदिर व्यवस्थापनाने घेणे आवश्यक आहे !

बुरखा आणि हिजाब हे मुसलमान महिलांवरील अत्याचार अन् अपमान यांचे प्रतीक ! – तस्लिमा नसरीन

बुरख्याद्वारे स्वत:ला झाकणे, हा मी अधिकार समजत नाही, तर ते स्त्रीवरील अत्याचाराचे प्रतीक आहे. बुरखा आणि हिजाब (मुसलमान महिलांचा गळा अन् मान झाकण्याचे वस्त्र) यांचा ‘महिलांना लैंगिक वस्तू बनवणे’, हा एकच उद्देश आहे.

ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन !

बजाज उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (वय ८३ वर्षे) यांचे १२ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता वयोमान आणि हृदयाचा विकार यांमुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.

पुण्यातील ‘आयसर’मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याकडून मुसलमान विद्यार्थिंनींचे समर्थन !

पुण्यातील राष्ट्रीय संस्था असलेल्या ‘आयसर’मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी कर्नाटक येथील उडुपीमधील मुसलमान समुदायातील त्या मुलींना हिजाबप्रकरणी पाठिंबा दर्शवला आहे.