अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हिंदूच !

उपलब्ध कागदपत्रांनुसार अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हिंदूच असून त्यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडत असल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घोषित केले आहे.

कर्नाटकात येणार्‍यांसाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्. निगेटिव्ह’ अहवालाची सक्ती रहित !

महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍यांसाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्. निगेटिव्ह’ (कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र) अहवालाची सक्ती रहित करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव टी.ए. अनिलकुमार यांनी ही घोषणा केली.

भारताच्या अंतर्गत गोष्टींवर करण्यात येणारी विधाने सहन केली जाणार नाहीत !

हिजाब प्रकरणाद्वारे भारतावर टीका करणार्‍या अन्य देशांवर भारताने कारवाई करणे अपेक्षित !

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समिती स्थापन करील !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर राज्यात समान नागरी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केली.

विक्रोळी (मुंबई) येथे योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजन महोत्सव’ साजरा करण्यात येणार !

‘व्हॅलेंटाईन डे’मुळे युवा पिढीमध्ये स्वैराचार आणि चंगळवाद वाढत आहे. पाश्चात्त्यांच्या या अंधानुकरणाऐवजी युवा पिढीमध्ये स्वत:च्या आई-वडिलांविषयी आदरभाव वृद्धींगत व्हावा, यासाठी योग वेदांत सेवा समितीच्या वतीने प्रतिवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्यात येतो.

सांगली येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये आणि भारतीय संस्कृतीचे जतन करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन !

व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये आणि भारतीय संस्कृतीचे जतन करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगलीतील मारुति चौक येथे १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत आंदोलन करण्यात आले.

‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून निवेदने !

‘व्हॅलेंटाइन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन समितीच्या वतीने मुलुंड येथील तहसीलदार संदीप थोरात यांना देण्यात आले.

पुणे येथील दगडूशेठ गणपतीला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’ !

येथील दगडूशेठ गणपति मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ‘श्रीं’च्या मूर्तीवर पडलेला किरणोत्सव भाविकांना अनुभवता आला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘श्री साई शिक्षण संस्थे’चे काम पहाणारे सनदी लेखापाल विशाल खतवानी यांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेची धाड !

सनदी लेखापाल (सीए) विशाल खतवानी यांच्या निवासावर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या पथकाने धाड घातली. खतवानी हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘श्री साई शिक्षण संस्थेचे कामकाज आणि हिशोब पहातात.

निफाड (नाशिक) येथील मोरे महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये ‘प्रपोज डे’च्या पार्श्वभूमीवर हाणामारी !

मेकॉलेप्रणीत पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! युवकांना ध्येयापासून दूर नेणारी आणि चंगळवादी बनवणारी पाश्चात्त्य ‘डे’ प्रथा बंद करण्यासाठी आतापर्यंतच्या सरकारच्या शिक्षण विभागाने पावले न उचलणे लज्जास्पद !