शिक्षण विभागाकडून ‘हिजाब घालून येऊ नये’, असा आदेश नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर तणाव निवळला
|
मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील बहुताली भागातील माध्यमिक शाळेमध्ये मुसलमान विद्यार्थिनी बुरखा आणि हिजाब घालून आल्यावर शिक्षकांनी त्यांना शाळेत येण्यापासून रोखले. या विद्यार्थिनींनी याची माहिती पालकांना दिल्यावर धर्मांधांचा मोठ्या संख्येने जमाव आला आणि त्यांनी शाळेची तोडफोड केली. पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या प्रकरणी आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
या हिंसाचारानंतर पोलिसांनी शाळेचे व्यवस्थापन आणि मुसलमान विद्यार्थिनींचे पालक यांच्यात एक बैठक आयोजित केली. या वेळी ‘बंगाल सरकारच्या शिक्षण विभागाकडून कोणत्याही शिक्षकाला विद्यार्थिनींनी हिजाब घालून न येण्याविषयीचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही’, असे स्पष्ट करण्यात आल्यावर प्रकरण निवळले.