कर्नाटक येथील हिजाबचे प्रकरण
पुणे – हिजाबबंदी विरोधातील याचिकांचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पेहराव परिधान करून महाविद्यालयात येऊ नये, असे निर्देश १० फेब्रुवारी या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयातील या याचिका तातडीने हस्तांतरित करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पुण्यातील राष्ट्रीय संस्था असलेल्या ‘आयसर’मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी कर्नाटक येथील उडुपीमधील मुसलमान समुदायातील त्या मुलींना हिजाबप्रकरणी पाठिंबा दर्शवला आहे.
कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणार्या ६ विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती; मात्र ‘हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ’, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी घेतली आहे. त्या प्रकरणावरून सध्या कर्नाटकात वादंग निर्माण झाला आहे.