वर्ष २०१८ ते २०२० या कालावधीत देशात २५ सहस्रांहून अधिक नागरिकांनी आत्महत्या केल्या ! – केंद्र सरकार

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला मूलभूत गोष्टी न पुरवल्यामुळेच लोकांना आत्महत्या करावी लागत आहे, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद !

बुरखा घातला नाही, तर एम्.आय.एम्.वाले मुस्कान खान हिच्यावर आक्रमण करतील, तेव्हा आता पाठिंबा देणारे तिला साथ देतील का ? – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

मुस्कान खान हिने बुरखा घातला नाही आणि एम्.आय.एम्.च्या गुंडांनी तिच्यावर आक्रमण केले तर ? आता तिला पाठिंबा देणारे लोक तिला त्या वेळी पाठिंबा देतील का ?, असा प्रश्‍न बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून विचारला आहे.

अमेरिकेतील काही राज्यांत आता मास्क घालणे बंधनकारक नाही  

वाढते लसीकरण आणि कोरोनाच्या संसर्गात झालेली घट, यांमुळे अमेरिकेत कोरोना प्रतिबंधात्मक नियम शिथिल करण्यात आले आहे.

भविष्यात भगवा ध्वज ‘राष्ट्रध्वज’ बनू शकतो; मात्र सध्या तिरंग्याचा आदर करायला हवा ! – कर्नाटकमधील मंत्री ईश्‍वरप्पा

भविष्यात भगवा ध्वज हा ‘राष्ट्रध्वज’ बनू शकतो; मात्र सध्या तिरंगा हा आता राष्ट्रध्वज असून त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे ग्रामीण विकास अन् पंचायत राज मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी केले.

धनबाद (झारखंड) येथे ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

बलात्काराच्या प्रकरणांत अशीच शिक्षा होऊ लागली, तर देशातील बलात्काराच्या घटना न्यून होण्यास साहाय्य होईल !

कर्नाटक उच्च न्यायालयात आधी सुनावणी होऊ द्या ! – सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाशी संबंधित याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची विनंती करणार्‍या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

हिजाब महत्त्वाचा भाग असल्याचे इस्लाममध्ये कुठेही लिहिलेले नाही ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

इस्लाममध्ये कुठेही लिहिले नाही की, हिजाब हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले