केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला धार्मिक स्थळांच्या सुरक्षेविषयी सतर्कतेची चेतावणी

केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबमधील सर्व गुरुद्वारा, मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. देशविरोधी घटक पंजाबमध्ये धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करू शकतात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकने अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रश्‍नांविषयी बोलू नये ! – अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमिद करझाई

 अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रश्‍नांविषयी पाकिस्तानने हस्तक्षेप करू नये, तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये अफगाणिस्तानचा प्रतिनिधी म्हणून बोलणे बंद करावे, अशी चेतावणी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमिद करझाई यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिली आहे.

श्रीलंकेच्या नौदलाकडून गेल्या २ दिवसांत ५५ भारतीय मासेमार्‍यांना अटक आणि ८ नौका जप्त

भारत सरकारने भारतीय मासेमार्‍यांना भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती होण्यासाठी तेथे दर्शक लावणे आवश्यक आहे. ते न केल्याने मासेमार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे !

चीनच्या प्रत्येक नागरिकावर ६ लाख ८० सहस्र ६९६ रुपये इतके कर्ज

भारताच्या शेजारी देशांच्या तुलनेत चीनवर सर्वाधिक, तर बांगलादेशवर सर्वांत अल्प कर्ज आहे. पाकिस्तान तर कर्जामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. चीनच्या प्रत्येक व्यक्तीवर ६ लाख ८० सहस्र ६९६ रुपये इतके कर्ज आहे.

आडाळी येथील औद्योगिक क्षेत्रात उद्योग आणि व्यवसाय चालू करण्यासाठी ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

७ वर्षे होऊनही औद्योगिक वसाहतीतील भूखंड उद्योजकांना देण्यात आलेले नाहीत.

गोवा मुक्तीचा षष्ट्यब्दिपूर्ती समारोप सोहळा साजरा

लोहपुरुष सरदार पटेल आणखी जगले असते, तर गोवा पुष्कळ आधी मुक्त झाला असता ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतातील शाळांतून तामसिक इंग्रजी भाषा शिकवली जाते; पण सात्त्विक संस्कृत भाषा शिकवत नाहीत. हे साहजिकच आहे; कारण स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतावर राज्य केलेल्या सर्व तामसिक राजकीय पक्षांना तामसिक इंग्रजी भाषा आपली वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

धर्मांध इस्लामिक संघटना रझा अकादमीवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालावी !

अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी ! अशी मागणी का करावी लागते ?

बेळगावमध्ये पोलीस प्रशासनाची मराठी भाषिकांविरोधात दडपशाही !

बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रकरण ! बेळगाव पोलिसांची दडपशाही चालू असून ऐन मध्यरात्री २७ जणांना अटक तर ६१ जणांवर गुन्हे नोंद ! यात काही अल्पवयीन युवकांचाही समावेश !