कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या वेळी २ ठिकाणी बाँबस्फोट !

३ जण घायाळ, एकाची स्थिती चिंताजनक

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बाँबस्फोटाच्या घटना होत असल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते ! – संपादक 

कोलकाता (बंगाल) – कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत असतांना दोन ठिकाणी बाँबस्फोट करण्यात आले. सियालदह आणि वार्ड क्रमांक ३६ मध्ये हे दोन बाँबस्फोट करण्यात आले. सियालदह येथील बाँबस्फोटात ३ मतदार घायाळ झाले. यांतील एकाची स्थिती चिंताजनक आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने पोलिसांकडून अहवाल मागितला आहे.