पुणे येथील ‘विश्व श्रीराम सेने’चे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांना ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल !

अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी ‘विश्व श्रीराम सेना’ या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, पर्यावरण संरक्षण, उपजीविका, आरोग्य, ग्रामविकास, महिला आणि बालविकास, ग्रामीण रोजगार, शेतकरी कल्याण, निष्पक्ष पत्रकारिता, संस्कृती संवर्धन-सुशासन अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य केले आहे.

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !

योगी आदित्यनाथ यांचा वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सहज विजय होईल ! – पी.व्ही.आर्. नरसिंह राव, अमेरिकास्थित प्रख्यात ज्योतिषी

वर्ष २०३०-३१ मध्ये विश्वयुद्ध होणार असून योगी आदित्यनाथ भारताचे नेतृत्व करतील, असेही त्यांनी वर्तवले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा २ दिवसांचा पुणे दौरा चालू असून त्यांनी १९ डिसेंबर या दिवशी सकाळी प्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन प्रारंभ केला.

फलटण (जिल्हा सातारा) येथे आढळले ओमिक्रॉनचे ३ रुग्ण !

दक्षिण आफ्रिकेतील युगांडा येथून एकाच कुटुंबातील ४ भारतीय नागरीक फलटण येथे आले. याविषयी माहिती मिळताच आरोग्य विभागाने त्यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये ४ पैकी ३ जण ओमिक्रॉनबाधित असल्याचे आढळले.

(म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध हिंदुत्वाशी जोडणे म्हणजे त्यांच्या महान कर्तृत्वाचा अपमान !’ – अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध हिंदुत्वाशी नाही, तर काय इस्लामशी जोडायचा का ? मुसलमानांच्या लांगूलचालनात आकंठ बुडालेल्या काँग्रेसचा ‘हिंदुपदपातशाह’ छत्रपती शिवाजी महाराज यांनाही पुरोगामी ठरवण्याचा अश्लाघ्य प्रकार !

भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्यात यावे !

सोलापूर येथील हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान आणि हिंदू एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रशासनास निवेदन

बीडमध्ये संतप्त माकडांच्या टोळीकडून २५० कुत्र्यांची हत्या !

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिलाला मारले. यानंतर संतप्त माकडांच्या टोळीने या परिसरातील कुत्र्यांची हत्या करण्यास प्रारंभ केला.

चिंचवड (जिल्हा पुणे) येथे श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन !

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वितीया म्हणजे २१ डिसेंबर ते मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी म्हणजेच २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत हा सोहळा होईल.

माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि लोकमान्य टिळक यांचे नातू दीपक टिळक यांचा उमेदवारी अर्ज !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि लोकमान्य टिळक यांचे नातू दीपक टिळक यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे.