
नवी देहली – देहलीच्या मेहरौली येथून देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५६० किलो कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे २ सहस्र कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ तस्करांना अटक केली आहे. यांतील हाशिमी महंमद वारिस आणि अब्दुल नायब या २ आरोपींकडून ४०० ग्रॅम हेरॉईन आणि १६० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. देहलीतील कोकेन जप्त करण्याची ही सर्वांत मोठी घटना मानली जात आहे.
पोलीस अधिकारी प्रमोदसिंह कुशवाह यांनी सांगितले की, तुषार गोयल असे एका आरोपीचे नाव आहे. तो देहलीतील वसंत विहार येथील रहिवासी आहे. त्याच्यासमवेत त्याचे २ मित्र हिमांशू आणि औरंगजेब हेही होते. तिन्ही आरोपींना मुंबईतील कुर्ला येथून भरत जैन याच्यासह पकडण्यात आले.
संपादकीय भूमिकापकडले गेलेले कोकेन इतके आहे, तर देशात न पकडले गेलेले कोकेन किती वितरित झाले असेल, याची कल्पना करता येत नाही ! |
मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा ! – पंतप्रधान
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !