गाझियाबाद (उत्तरप्रदेश) -जिल्ह्यातील एका हिंदु महिलेवर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या महिलेला ख्रिस्ती होण्याचे प्रलोभन दाखवले जात होते. तिला ‘तुझी सर्व दु:खे दूर होतील, भरपूर पैसे मिळतील’, असे सांगितले जात होते. तिला बायबल वाचण्याचीही सक्ती करण्यात आली होती.
१. ३० सप्टेंबर या दिवशी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल ) केली. ती सायन विहार परिसरात रहाते. तिच्या घराजवळ पुष्पा नावाची महिलाही रहाते. अनेक दिवसांपासून पुष्पा तिच्यावर ख्रिस्ती होण्यासाठी दबाव आणत होती, असे तक्रारीत म्हटले आहे.
२. पुष्पा हिचे आणखी काही साथीदारही या कटात सहभागी आहेत. पुष्पा पीडित महिलेला बलपूर्वक सोनू नावाच्या एका व्यक्तीच्या घरी घेऊन गेली. तेथे येशूची प्रार्थनासभा चालू होती.
३. पीडितेला प्रार्थनासभेत बलपूवक बायबल वाचायला लावले. या वेळी पीडितेचा पती त्याच्या काही मित्रांसह तेथे पोचला आणि त्याने पत्नीची तेथून सुटका केली.
४. पुष्पा आणि तिचे साथीदार यांनी यापूर्वीही अनेक हिंदूंना ख्रिस्ती बनवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
५. गाझियाबादचे पोलीस अधीक्षक लिपी नागायच यांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पासहित इतर आरोपींच्या विरोधान गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके सिद्ध करण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकाख्रिस्त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्यामुळेच ते हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. अशांवर कठोर शिक्षा केली, तरच हे प्रकार थांबतील ! |