Iran Calls Netanyahu Hitler : (म्‍हणे) ‘बेंजामिन नेतान्‍याहू २१ व्‍या शतकातील हिटलर !’ – इराणचे भारतातील राजदूत

इराणच्‍या भारतातील राजदूताचा थयथयाट

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्‍याहू व इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही

नवी देहली – इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी इस्रायलला चेतावणी देतांना म्‍हटले आहे की, इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील आक्रमणे थांबवली नाही, तर इराण इस्रायलवर पुन्‍हा आक्रमण करेल. तसेच इराणच्‍या राजदूतांनी बेंजामिन नेतान्‍याहू यांना ‘२१ व्‍या शतकातील हिटलर’ असे संबोधले. इराणने इस्रायलवर केलेल्‍या क्षेपणास्‍त्र आक्रमणाला जगभरातील अनेक देशांचे समर्थन मिळेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. जर्मनीचा हुकूमशाह अडॉल्‍फ हिटलर याने लाखो ज्‍यूंचा नरसंहार केला. सध्‍या इस्रायलने गाझा, लेबनॉन आणि इराण या देशांवर आक्रमण करून तेथे नरसहांर करत असल्‍याने इस्‍लामी देशांतील अनेक नेते इस्रायलचे पंतप्रधान नेतान्‍याहू यांची तुलना वारंवार हिटलरशी करतात.

भारताकडे मागितले साहाय्‍य !

इराणचे राजदूत म्‍हणाले की, भारत हा एक अतिशय महत्त्वाचा देश आहे. त्‍याचे इराण आणि इस्रायल या दोन्‍ही देशांशी चांगले संबंध आहेत. भारत या प्रदेशातील क्रूरता थांबवण्‍यास साहाय्‍य करू शकेल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

संपादकीय भूमिका

जर नेतान्‍याहू हिटलर असतील, तर हमास आणि हिजबुल्ला यांच्‍या आतंकवाद्यांनी जे कृत्‍य केले, त्‍याला इराणचे राजदूत काय म्‍हणणार ? इस्‍लामी आक्रमकांनी जगभरात तलवारीच्‍या जोरावर जो नरसंहार केला, तर कुठलीही उपमा दिली, तरी ती अल्‍पच पडणार, हे निश्‍चित !