नवी देहली – भारताच्या शेजारी देशांच्या तुलनेत चीनवर सर्वाधिक, तर बांगलादेशवर सर्वांत अल्प कर्ज आहे. पाकिस्तान तर कर्जामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. चीनच्या प्रत्येक व्यक्तीवर ६ लाख ८० सहस्र ६९६ रुपये इतके कर्ज आहे. चीनची लोकसंख्या १४४ कोटी ४७ लाख आहे. चीनने प्रगती केली, असे म्हटले जात असले, तरी त्याने मोठ्या प्रमाणात परदेशी कर्ज घेतले आहे. बांगलादेशातील प्रत्येक नागरिकावर सध्या २० सहस्र रुपयांचे कर्ज आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्या तुलनेत ते पुष्कळ अल्प आहे. भारतात प्रती माणशी विदेशी कर्ज हे ३२ सहस्र रुपये आहे.