नवी देहली – देहलीतील कालिंदी कुंज येथील जैतपूर भागातील नीमा रुग्णालयामध्ये एका ५५ वर्षीय डॉक्टरची २ अल्पवयीन मुलांनी गोळ्या झाडून हत्या केली. युनानी डॉक्टर जावेद अख्तर असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. (हे देहली पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! – संपादक)
रुग्णालयातील कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींचे वय १६-१७ वर्षांचे आहे. एका आरोपीवर १ ऑक्टोबर या दिवशी पायाच्या दुखापतीवर उपचार करण्यात आले होते. २ ऑक्टोबरला तो रुग्ण रात्री उशिरा दुसर्या एका मुलाला घेऊन रुग्णालयात पोचला. प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असल्याचे सांगून दोन्ही आरोपी डॉक्टर जावेद यांना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेले. तेथे डॉक्टरवर गोळ्या झाडून आरोपी पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. या प्रकरणी अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाअशांना अल्पवयीन म्हणता येईल का ? अशा मुलांना मोठ्यांना जी शिक्षा सुनावली जाते, तीच शिक्षा सुनावणे आवश्यक ! |

Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा ! – पंतप्रधान
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा