धाराशिव आगारात संपकरी आणि एस्.टी. कर्मचारी यांच्यातील वादामुळे कर्तव्यावरील कर्मचारी बेशुद्ध !

ऐन दिवाळीत चालू झालेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपानंतर सरकारच्या आवाहनामुळे काही कर्मचारी कामावर आले; मात्र आंदोलकांच्या दबावापुढे त्यांचे काहीही चालत नाही.

संभाजीनगरमधील छोट्या व्यावसायिकांच्या गळ्याभोवती ‘नंबर’ सावकारीचा फास !

लोकांनी घेतलेल्या कर्जावर भरमसाठ व्याज लावून त्यांच्याकडून पैशांची वसुली करणे हा गुन्हा आहे. असे असतांनाही पोलीस सावकारीच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत, हे दुर्दैवी आहे. 

बंदमधील हानीची रक्कम राजकीय पक्षांकडून वसूल करण्याची मागणी !

महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !

नागपूर येथे ९ हवाला व्यापार्‍यांच्या घरी टाकलेल्या धाडीत ८४ लाख रुपयांची रक्कम जप्त !

गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण-घेवाण होत असतांना पोलीस आणि आयकर विभाग यांतील अधिकार्‍यांनी वेळोवेळी या व्यवहारांची शहानिशा का केली नाही ? निवडणुका जवळ आल्यानंतर झोपेतून जागे होणारे पोलीस काय कामाचे ?

नगरपंचायत निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातील ६ नगरपंचायतींचा समावेश !

राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ६ नगरपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रासह भारताचा योग आणि आयुर्वेद यांच्या संशोधनावरही भर ! – धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री

भारताने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रात भर देण्यासह सामाजिक सुधारणा करण्यासाठी योग आणि आयुर्वेद यांच्या संशोधनावरही भर दिला आहे, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.

हिंगोली येथे नक्षलवादी होण्याची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांनी वीजजोडणीसाठी विहिरीत उड्या मारल्या !

प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेल्या २ घंट्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केले.

मातृभाषा आणि मातृभूमी यांविषयीच्या अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे स्पष्ट करून राज्यपाल म्हणाले की, मातृभाषेविषयी आस्था आणि अभिमान जोपासतांना तिच्याविषयीच्या जाणिवा वृद्धींगत होण्यासाठी कृतीशील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे मलकापूर (जिल्हा बुलढाणा) अर्बन बँकेत ग्राहकांची गर्दी !

या बँकेच्या २८ शाखा असून १ सहस्र कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. नवीन मालमत्ता विक्रीवर बंदी असून कर्जाचे नूतनीकरणही सध्या करता येणार नाही.

राजशिष्टाचाराचे पालन लोकप्रतिनिधींनीही करावे !

केवळ शासन आदेशावर सन्मानाची अपेक्षा करण्याऐवजी लोकप्रतिनिधींनी प्रशासन आणि जनता यांच्या सन्मानास पात्र होऊ, अशी कृती करावी. असे केल्यास लोकप्रतिनिधींच्या सन्मानासाठी पुन: पुन्हा आदेश काढण्याची वेळ येणार नाही.