गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण-घेवाण होत असतांना पोलीस आणि आयकर विभाग यांतील अधिकार्यांनी वेळोवेळी या व्यवहारांची शहानिशा का केली नाही ? निवडणुका जवळ आल्यानंतर झोपेतून जागे होणारे पोलीस काय कामाचे ?
नागपूर – आगामी विधान परिषदेच्या निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी २६ नोव्हेंबर या दिवशी शहरातील किराणा आणि धान्य विक्रीशी संबंधित असणार्या ९ व्यापार्यांच्या घरी धाडी टाकल्या. पोलिसांनी हवालाची ८४ लाख रुपयांची रक्कम जप्त केली. शहरात अनुमाने २०० हवाला व्यावसायिक असून ते कोट्यवधी रुपयांच्या रकमेची हेराफेरी करतात.
घटनास्थळी पोलिसांना २०० हून अधिक ‘लॉकर्स’ सापडले. बहुतांश ‘लॉकर्स’मध्ये लाखो रुपयांची रक्कम आणि नोटा मोजण्याचे साहित्य होते. प्राप्तीकर विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत.