सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनार्‍यांवर जीवन रक्षकांची नेमणूक करा ! – युवासेनेची मागणी

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा, वेळागर समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील परिसरासह जिल्ह्यातील गर्दी होणार्‍या समुद्र किनार्‍यांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.

जहाजावरील अमली पदार्थांच्या पार्टीच्या आयोजकांची चौकशी करा ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

मलिक म्हणाले, ‘‘कॉर्डेलिया क्रूझ’ला कोणत्याही प्रकारची अनुमती देण्यात आली नव्हती. असे असतांना जहाज कसे सोडले ? जहाजावर ‘रेव्ह पार्टी’ होती, तर या पार्टीत सहभागी असलेल्या सर्व लोकांची पडताळणी का केली नाही ?

सोलापूर येथील कु. दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) या सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

समष्टी साधनेची तीव्र तळमळ, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणार्‍या, तसेच श्रीकृष्णाप्रती गोपीभाव असलेल्या कु. दीपाली मतकर या २८ ऑक्टोबर या दिवशी सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंच’च्या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचे प्रकाशन पार पडले !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अलौकिक कार्याची माहिती, त्यांचे चरित्र लोकांपर्यंत पोचावे, तसेच हिंदु राष्ट्राविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाची निर्मिती गेल्या १८ वर्षांपासून केली जात आहे.

‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईच्या प्रकरणी आर्यन खान याच्यासह दोघांना जामीन संमत !

या प्रकरणी अधिवक्ता सुभाष झा आणि अधिवक्ता अंबरीष मिश्रा यांनी म्हटले, ‘‘न्यायालयात जामिनासाठी १०० अर्ज प्रलंबित असतांना आर्यन खान यालाच जामीन मिळाला.’’

माझ्या नावाची बनावट स्वाक्षरी करून कारखान्याने ३२८ कोटी रुपयांचे कर्ज काढले ! – संजय राख, संचालक, साखर कारखाना

के.जी.एस्. खासगी साखर कारखान्यातील कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे प्रकरण

अशा ‘तुशारा’ भारतात सर्वत्र हव्यात !

एका महिलेवर झालेल्या आक्रमणाचा निषेध तर करायचा आहेच त्याशिवाय त्या महिलेच्या व्यापक विचाराचा प्रचार करून तिचा सन्मानही करायचा आहे. सध्या हिंदूंचा मोठा सण दिवाळी जवळ येत आहे. या उत्सवात हिंदूंनी ‘हलालमुक्त भारता’चा संकल्प करून कृतीशील व्हायला हवे !

मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास ‘लाँग मार्च’ काढणार ! – खासदार छत्रपती संभाजीराजे

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ‘लाँग मार्च’ काढण्याची घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीराजे जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या वेळी मोहोळमध्ये पत्रकारांशी चर्चा करतांना ते बोलत होते.

साळगांव येथे सागाच्या लाकडाची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी एकावर गुन्हा नोंद

कुडाळ तालुक्यातील साळगांव येथे सागाच्या लाकडाची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या ट्रकवर कुडाळ येथील वनविभागाच्या पथकाने २७ ऑक्टोबरला रात्री कारवाई केली.

शेतकर्‍यांच्या समस्येवर उपाय काय ?

महावितरण आस्थापनाने थकीत वीजदेयकांची रक्कम न भरल्याने शेतकर्‍यांच्या वीजकपातीची कारवाई चालू केली आहे. महावितरणने ती कारवाई करू नये; म्हणून मोडनिंब (जिल्हा सोलापूर) येथे शेतकर्‍यांनी नुकताच मोर्चा काढला.