सोलापूर येथील कु. दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) या सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

  • दीपावलीच्या पूर्वीच सोलापूर येथे लागले साधकांचे आध्यात्मिक प्रगतीरूपी दीप !

  • सौ. सुनंदा म्हेत्रे (वय ५३ वर्षे) आणि श्री. राजन बुणगे (वय ६६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

पू. (कु.) दीपाली मतकर

सोलापूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – दिवाळी जवळ येताच सर्वत्रचे वातावरण मंगलमय होण्यास प्रारंभ होतो. दिवाळीला काही दिवस शेष असतांना सोलापूर येथे झालेल्या संत सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून येथील साधकांनी आनंददीप लागल्याचे अनुभवले. समष्टी साधनेची तीव्र तळमळ, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणार्‍या, तसेच श्रीकृष्णाप्रती गोपीभाव असलेल्या कु. दीपाली मतकर या २८ ऑक्टोबर या दिवशी सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन पू. (कु.) दीपाली मतकर यांचा सन्मान करण्यात आला. ही आनंदवार्ता ऐकून सर्वांचा भाव जागृत झाला आणि सर्वांना पुष्कळ आनंद झाला.

सौ. सुनंदा म्हेत्रे
श्री. राजन बुणगे

शारीरिक व्याधीवर मात करत भावपूर्ण आणि तळमळीने सेवा करणार्‍या सोलापूर येथील सौ. सुनंदा म्हेत्रे (वय ५३ वर्षे) आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवून सातत्याने भावावस्था अनुभवणारे श्री. राजन बुणगे (वय ६६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचेही या वेळी घोषित करण्यात आले.