मुंबई – जहाजावरील अमली पदार्थांच्या पार्टीच्या आयोजकांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. या पार्टीचे आयोजक ‘फॅशन टीव्ही’चे भारतातील प्रमुख काशिद खान हे होते. ते अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी केली जात नाही, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
मलिक म्हणाले, ‘‘कॉर्डेलिया क्रूझ’ला कोणत्याही प्रकारची अनुमती देण्यात आली नव्हती. असे असतांना जहाज कसे सोडले ? जहाजावर ‘रेव्ह पार्टी’ होती, तर या पार्टीत सहभागी असलेल्या सर्व लोकांची पडताळणी का केली नाही ? या सगळ्या गोष्टी जाणूनबुजून करण्यात आल्या. केवळ १३ लोकांना लक्ष्य केले गेले. हा संपूर्ण खेळ पार्टीच्या आयोजकांचा आहे.’’