मुंबई – मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ‘लाँग मार्च’ काढण्याची घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीराजे जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर होते. या वेळी मोहोळमध्ये पत्रकारांशी चर्चा करतांना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, गरीब मराठ्यांची हानी होत असेल, तर आम्हाला ‘लाँग मार्च’ काढण्यावाचून पर्याय उरणार नाही. गेल्या ७-८ मासांत आम्ही राज्यशासनासमोर अनेक प्रश्न मांडले आहेत. पत्र दिले, मूक आंदोलन केले; पण त्यातून काही निष्पन्न होत नाही.