सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनार्‍यांवर जीवन रक्षकांची नेमणूक करा ! – युवासेनेची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

वेंगुर्ले – तालुक्यातील शिरोडा, वेळागर समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची संख्या वाढत आहे. काही पर्यटक समुद्रात जातात; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे येथील परिसरासह जिल्ह्यातील गर्दी होणार्‍या समुद्र किनार्‍यांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे. या वेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना पदाधिकारी मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे आदी उपस्थित होते.