जावयाला वाचवण्यासाठी नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न !

समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा आरोप !

डावीकडून क्रांती रेडकर आणि नवाब मलिक

मुंबई – नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा प्रसारित केलेला जन्माचा दाखला चुकीचा आहे. आमची खासगी छायाचित्रे सर्वांसमोर आणून नवाब मलिक त्यांनी घेतलेल्या शपथेच्या विरोधात काम करत आहेत. आम्ही लवकरच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू. समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा त्यांचा एकच हेतू आहे, तो म्हणजे मलिक यांना जावयाला वाचवता येईल, असा आरोप अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर केला आहे.