निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांना चालना मिळण्यासाठी अमित शहा यांची गोवा भेट महत्त्वाची ! – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोवा भेटीवर !

श्री. देवेंद्र फडणवीस

पणजी, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबरला गोव्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गोवा शासन सिद्ध झाले आहे. वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांना चालना मिळण्यासाठी अमित शहा यांची गोवा भेट महत्त्वाची असल्याचे गोव्यातील भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘अमित शहा गोव्यातील निवडणुकीविषयी भाजपच्या सिद्धतेचा आढावा घेतील, तसेच ते पक्षातील आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशीही बोलणी करतील.’’ अमित शहा यांच्या गोवा भेटीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे साहाय्यक नेते सी.टी. रवि गोव्यात दाखल झाले आहेत.