दहिसरमध्ये वारकर्‍यांच्या शिल्पाची विटंबना !

दहिसरमध्ये वारकरी शिल्पांची तोडफोड

मुंबई – काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक वारकर्‍यांच्या शिल्पाची विटंबना केल्याची घटना दहिसर येथे घडली आहे. सीसीटीव्ही चित्रणामध्ये हे दिसून आले आले आहे. एका स्कुटीवरून आलेल्या तिघांपैकी दोघे जण या शिल्पाची विटंबना करतांना दिसत आहेत. यामध्ये एक जण शिल्पामधील वारकर्‍याची प्रतिकृती पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. या घटनेवरून आचार्य तुषार भोसले म्हणाले की, राज्यातील सत्ता देव, धर्म आणि वारकरी विरोधी असल्याने समाजकंटांचे असे धैर्य व्हायला लागले आहे. या शिल्पाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.